
आमच्या बद्दल
नमस्कार मी किरण साबळे फोटोग्राफरांसाठी अल्बम डिझाइनिंगची सर्व्हिस पुरवतो, फोटोशॉप लेटेस्ट सॉफ्टवेअर मध्ये मॅन्युअली फोटो एडीट केले जातात, त्याच बरोबर फोटो एडिटिंगसाठी कॅमेरा-रॉ चा वापर देखील केला जातो. पेज डिझाईन करण्याआधी सर्व फोटो एडिट केलेले असल्यामुळे पेज वर फोटो एक-सारख्या टोन मध्ये दिसतात, अल्बम एकदम कलरफुल मध्ये प्रिंट होऊन येतो. अल्बम डिझाईन करताना आपल्या फोटोना शोभेल असे पेज तयार केले जातात, अल्बम मध्ये फॅमिली मेम्बर्स वर जास्त लक्ष दिलेले असते, फॅमिली फोटोंवर देखील मॅन्युअली काम केले जाते.
फोटोग्राफर्स ना आम्ही वेळेत काम देण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न राहतो, साधारण पणे अल्बम डिझाईनला दिल्यानंतर आम्ही 7 ते 8 दिवसांत अल्बम डिझाईन करून देतो, अर्जट अल्बम डिझाईन देखील दिली जाते त्यासाठी रेग्यूलर डिझाईन चार्ज पेक्षा नॉर्मल चार्ज एक्सट्रा घेतले जातात. तुम्ही महाराष्ट्रामधून कोठून ही अल्बम डिझाईनसाठी पाठवू शकता. आमच्याकडे अल्बम नंबर प्रमाणे डिझाईन केले जातात, ज्या दिवशी अल्बम डेटा आमच्याकडे येतो व त्या अल्बम चा ऍडव्हान्स जमा होतो त्या दिवसापासून अल्बम नंबर मध्ये लागला जातो व 8 दिवसांच्याआत अल्बम डिझाईन करून आपल्याला मिळतो. आमच्या बद्दल आणखी माहिती वाचण्यासाठी वेबसाइटच्या About पेज ला भेट द्या.
अल्बम डिझाईनला पाठवण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा .
- आपण सिलेक्ट केलेल्या सर्व फोटो व फोल्डरचे एकत्रित 1 फोल्डर तयार करा.
- आता एकत्रित फोल्डरची एक झिप फाईल तयार करा.
- तयार झालेली झिप फाईल तुमच्या गूगल ड्राईव्ह वर अपलोड करा.
- अपलोड केलेल्या झिप फाईलची शेयर लिंक कॉपी करा.
- कॉपी केलेली लिंक आम्हाला व्हॅट्सअप किंवा ई-मेल वर शेयर करा.
डिझाईनींग चार्जेस
अल्बम डिझाईनींग चार्जेस 70 ₹ पर पेज पासून पुढे .
(अल्बम कालावधी 7 ते 8 दिवसांत PDF चेक साठी दिली जाईल)
अल्बम डिझाईन प्रोसेस
- अल्बम एडिटिंगला घेतल्यावर आपल्याला व्हॅट्सअप द्वारे कळवले जाईल.
- अल्बम डिझाईन पूर्ण झाल्यावर आपल्याला चेक करण्यासाठी PDF स्वरूपात पाठवला जाईल.
- आपण पाठवलेले बदल पूर्ण करून व फायनल टच देऊन अल्बम आपल्याला JPEG स्वरूपात पाठवला जाईल.
गोपनीयता (Privacy)
- आम्ही आपले डिझाईन केलेले अल्बम कोणत्याही सोशल मीडियावर शेयर करत नाही.
- इतर कोणत्याही फोटोग्राफर किंवा प्रिंटिंग लॅब कडे आपला डेटा व माहिती शेयर केली जात नाही.
- फायनल डिझाईन आपल्याला पाठवल्या नंतर कोणताही डेटा आम्ही स्टोर ठेवत नाही.
आम्ही अल्बम डिझाईन कशा प्रकारे करतो हे पाहण्यासाठी आमच्या YouTube व्हिडिओ पहा.
नियम व अटी (T&C)
आमच्या सर्व फोटोग्राफर मित्रांना आमच्याकडून डिझायनिंग चे काम करून घेते वेळी काही अडचणी येऊ नये म्हणून आम्ही काही नियम व अटी बनवत आहोत जे ने करून आमच्याकडून सर्वात्कृष्ट सेवा आपल्याला पुरवता येईल.
- अल्बम डिझाईन साठी सर्व फोटो सिलेक्ट करून द्यावे.
- फॅमिली व महत्वाच्या फोटोचे वेगळे फोल्डर तयार करून द्यावे.
- क्लोजअप फोटो मधील डोळे झाकलेले व खराब फोटो डिलिट करावेत जेणेकरुन फोल्डर साईझ कमी होईल.
- पहिल्या अल्बमचे डिझाईन फायनल झाल्या नंतर दुसरा अल्बम डिझाईन ला घेतला जाईल.
- 1 अल्बम एडिट करण्यासाठी 24-36 तास लागू शकतात.
- सलग 2 अल्बम मध्ये 3-4 दिवसाचे अंतर असू शकते, (फोटो करेक्शन व फोटो कटिंग ला लागणार वेळ)
- अल्बम डिझाईन झाल्या नंतर आपल्याला लगेच व्हॅट्स अँप वर PDF स्वरूपात पाठवला जाईल.
- अल्बम डिझाईन फायनल झाल्या नंतर 24 तासाच्या आत काही करेक्शन असल्यास सांगावे नाहीतर नंतर होणार नाही.
- मिक्सिंग पेज (DM Page) वरील कपल चे नाव (स्पेलिंग सहित) लग्नाची तारीख चेक करून घेणे नंतर कुठल्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
- प्रिंटिंग ची कुठल्याही प्रकार ची जबाबदारी SK Album ची राहणार नाही.
- 12×36 पर्यंतच्या किंवा त्याच्या आतील सर्व साईझ चे रेट सेम असतील.
- अल्बम डिझाईन बाबतीत आपल्या काही कल्पना किंवा इतर काही मागणी असेल तर अल्बम देते वेळी सर्व सांगावे.
- अल्बम डिझाईन हे संकल्पनेने बनवले जाते त्यामुळे चूक असेल तरच करेक्शन केलं जाईल. (imp फोटो छोटा झाला, नाव चुकले, डबल फोटो, लाईट प्रॉब्लेम इ.)
- 1 जानेवारी 2021 पासून आमच्याकडे फक्त अल्बम कॉपी करून नंबर मध्ये घेतले जाणार नाहीत, (ऍडव्हान्स आवश्यक)
- अल्बम डिझाइन ला देते वेळी 70 ते 80% एका अल्बम चा ऍडव्हान्स अनिवार्य राहील.
- ऍडव्हान्स शिवाय अल्बम नंबर मध्ये राहणार नाही किंवा डिझाईन केला जाणार नाही.
- अल्बम च संपुर्ण पेमेंट जमा असल्या शिवाय फायनल अल्बम मिळणार नाही.
- ऍडव्हान्स जमा असल्यास 7-8 दिवसात अल्बम देण्याचा प्रयत्न राहील.(कारण सर्व अल्बम सारखे नसतात म्हणून (40 / 50 / 60 पेज) वेळ किंवा कमी-जास्त लागू शकतो.
- फायनल अल्बम दिल्यानंतर आम्ही कोणत्याही प्रकारचा डेटा सेव्ह ठेवत नाही.
- डिझाईन केलेल्या अल्बमचा रॉ-डेटा / PSD File दिल्या जात नाही.
- सर्वात महत्वाचे अल्बम प्रिंट होईपर्यंत फोटो / डिझाईन अल्बम डिलिट करू नये.
आमची धोरणे कठोर आहेत हे आम्हाला समजते. 2010 पासून आम्ही अल्बम डिझाईन ची सर्व्हिस पुरवत आहोत, त्यामुळे याआधी ग्राहकांकडून अनेक फसव्या प्रक्रियांचा सामना केला आहे. तुमचा अनुभव वाढवण्यासाठी आम्ही तुम्हाला सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करू. आमचा पुर्णतः प्रयत्न राहील की आपल्याला प्रोफेशनल काम देण्याचा. आमच्या कडून अल्बम डिझाईन करून घेणाऱ्या सर्वांचे या स्पर्धेच्या युगात अल्बम चांगल्या प्रकारे डिझाईन करून तुमचे अल्बम सुंदर डिझाईन करण्यासाठी आम्ही 100% प्रयत्नशील आहोत.
आम्हाला वेळ दिल्याबद्दल आपले आभार. 🙏🏻
4.9Top Rated Serviceverified by TrustindexTrustindex verifies that the company has a review score above 4.5, based on reviews collected on Google over the past 12 months, qualifying it to receive the Top Rated Certificate.